शेतकऱ्यांनो क्रेडिट कार्ड मिळेल; पण अर्ज करावा लागेल | PM Kisan Credit Card Marathi

Pm Kisan Credit Card Marathi : शेतकऱ्यांना शेतीतील मशागत, खत, बी-बियाणे इत्यादीसाठी वेळोवेळी पैश्याची गरज भासते. अश्यावेळी शेतकऱ्यांनी एखाद्या सावकाराकडे हात न पसरता स्वाभिमानाने जगावे म्हणून सुरु करण्यात आलेली योजना म्हणजे ! PM Kisan Credit Card Scheme होय. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी हव्या त्या वेळी ठराविक रक्कम त्यांच्या Credit Card मधून काढून वापरू शकतात व मुदतीमध्ये परत भरू शकतात.

पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिलं जात आहे. क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर बँकेने देण्यात आलेल्या मंजूर LImit नुसार शेतकऱ्यांना कर्जातील पैसे काढण्याची सोय क्रेडिट कार्डमुळे होत आहे. कार्डमधील पैसे काढून मुदतीमध्ये रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना सवलतसुध्दा दिली जाते. किसान क्रेडिट कार्डसाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकतात ? लागणारी कागदपत्रे ? व्याजदर ? अर्ज कसा करावा ? या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Pm Kisan Credit Card नेमकं काय ?

RBI च्या म्हण्यानुसार PM Kisan Credit Card चा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीसाठी व इतर गरजांसाठी सोप्यापद्धतीने बँकिंग प्रणालीकडून पुरेशी व वेळेवर आर्थिक मदत प्रदान करणे होय.

पशुधन व मत्ससाठीही कर्ज

  • खरीप व रब्बी हंगामात बहुतांश शेतकरी कर्ज उचलतात.
  • ज्यामध्ये 25% ते 30 % शेतकरी वर्ग क्रेडिट कार्डचा वापर करतात. किसान क्रेडिट कार्डवर पशुधन व मत्स्यसाठी ही कर्ज उपलब्ध करून दिलं जात.
See also  शेतकऱ्यांच्या पैशांची कर्जकपात होणार नाही, सहकार विभागांचा आदेश !

किसान Credit कार्डसाठी कोणते शेतकरी अर्ज करु शकतात ?

  • वैयक्तिक / संयुक्त शेती करणारे शेतकरी, भाडेकरू शेतकरी
  • किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकरी किसान सम्मान निधीचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी स्वयं सहाय्यता गट ( SHG )
  • अर्जदारांचे वय किमान 18 वर्ष व कमाल 75 वर्ष इतकं असावं
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर वारसदार असणे आवश्यक

किसान Credit Card कोणत्या बँकेमार्फत दिलं जातं ?

बऱ्याच प्रसिद्ध राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांमार्फत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं. ज्यामध्ये Central Bank Of India, State Bank Of India ( SBI ), HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank इत्यादी बँकेचा समावेश आहे.

किसान क्रेडिट कार्ड व्याजदर व फीस

किसान क्रेडिट कार्डसाठी विविध बँकेमार्फत वेगवेगळी फीस व व्याजदर आकारली जातात. इतर फीस व चार्जेस ज्यामध्ये Processing Fees, Insurance etc चा समावेश असतो. खालीलप्रमाणे काही निश्चित बँकेचे व्याजदर दर्शविण्यात आले आहेत.

बँकेचे नावव्याजदर
SBI किसान क्रेडिट कार्डकमीत कमी 7% वार्षिक
HDFC बँक किसान क्रेडिट कार्डकमीत कमी 9% वार्षिक
Axis बँक क्रेडिट कार्ड8.85 % वार्षिक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया KCC7% वार्षिक

किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • जमिनीचा 7/12 व 8अ उतारा
  • ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरलेला KCC फॉर्म
  • पीकपेरा
  • ठेव जमा ( Security Deposit – Loan मर्यादा जास्त असेल तर..)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

KCC साठी अर्ज कसा करावा ?

सामान्यता किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकरी 2 पद्धतीने अर्ज करू शकतात. ज्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर किसान क्रेडिट कार्ड संदर्भातील अर्ज. दुसरी पद्धत म्हणजे ज्या बँकेमध्ये किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल, त्या बँकेमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म भरून देणे.

Pm Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गतसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना किसान Credit Card शासनामार्फत देण्यात आलेले आहेत. किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना भेटत असतील त्या बँकेमध्ये शेतकरी स्वतः भेट देऊन किसान क्रेडिट कार्डबद्दल चौकशी करू शकतात.

See also  Crop Loss Compensation : अतिवृष्टीची नोंद नसली, तरी मिळणार आर्थिक मदत | ativrushti nuksan bharpai madat maharashtra
KCC CSC च्या माध्यमातून ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
SBI ऑनलाईन KCC Applyयेथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा !येथे क्लिक करा
शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप

CSC च्या माध्यमातुन किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म भरण्यासाठी खालील विडिओ नक्की पहा !

किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन कसा काढावा ?

किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून बँकेमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रं दिल्यानंतर तुम्हांला Kisan Credit Card दिलं जात.

किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांच्या नावाने किती शेती असावी ?

कमीत कमी अर्धा एकर म्हणजेच ०.२० R इतकी जरी जमीन शेतकऱ्यांच्या नावाने असेल तर शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात.

किसान क्रेडिट कार्डसाठी व्याजदर किती असतो ?

विविध बँकेनुसार व्याजदर कमी-जास्त असतो. पण सामान्यतः कमीत कमी 7 % व जास्तीत जास्त 9-12 % पर्येंत KCC चा व्याजदर असतो.