100 रुपयांत रवा, चनाडाळ, साखर आणि तेल; शिंदे सरकारचा रेशनकार्ड धारकांसाठी दिवाळी बोनस पॅकेज : Ration Card Diwali Bonus Package

Ration Card Diwali Bonus Package : नमस्कार मित्रांनो, शिंदे-फडणवीस सरकारकडून रेशनधारक नागरिकांसाठी दिवाळीनिमित्त एक विशेष निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

रेशनकार्ड धारकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. रेशनकार्ड धारकांसाठी दिवाळी पॅकेज घोषित करण्यात आलेले असून, या अंतर्गत नागरिकांना 100 रुपयांमध्ये विविध वस्तू दिल्या जाणार आहेत.

Ration Card Diwali Bonus

दिवाळीनिमित्ताने जीवनावश्यक असलेल्या अशा चार वस्तू शिंदे फडणवीस सरकारमार्फत फक्त शंभर रुपयांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. ज्यामध्ये जनसामान्य नागरिकांना रेशन दुकानावर (Ration Shop) शंभर रुपयांमध्ये रवा, चनाडाळ, साखर आणि तेल या वस्तू दिल्या जाणार आहेत.

राशन दिवाळी बोनस पॅकजे जाहीर

Ration Diwali Bonus Package चा लाभ कुठे भेटेल ?

दिवाळी बोनस रेशन कार्ड धारकांना दिला जाणार असल्यामुळे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांना गावातील राशन दुकानावर खालील सर्व नमूद वस्तू फक्त 100 रुपयांमध्ये दिल्या जातील.

हे सुध्दा वाचा : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आता रेशनकार्ड धारकांना आणखी ३ महिने मोफत राशन मिळणार

Ration Card Diwali Bonus मधून काय वस्तू भेटणार ?

खालील सर्व वस्तू रेशनकार्ड धारक नागरिकांना फक्त शंभर रुपयांमध्ये दिवाळीच्या सणानिमित्त दिल्या जाणार आहेत.• 1 किलो साखर

  • 1 किलो रवा
  • 1 किलो डाळ
  • 1 लिटर पामतेल पॅकेट
  • 1 किलो साखर

शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे जनसामान्य रेशन कार्ड धारकांची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे. मान्य आहे या वस्तू खूपच कमी आहेत; परंतु दिवाळीनिमित्त या वस्तूंच्या वाटपामागील उद्देश नक्कीच चांगला आहे.

माहिती काळजीपूर्वक वाचा

या संदर्भातील खालील व्हिडिओ नक्की पहा.

राशन दिवाळी संच भेट

सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जवळपास 1 कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना ( Ration Card Holder ) अत्यंत कमी दरामध्ये दिवाळीतील फराळासाठीच्या आवश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर अंदाजीत 500 कोटीचा भार पडणार आहे.

या मंत्रिमंडळ निर्णयाचा अथवा योजनेचा लाभ कोणाला भेटणार ?

सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ भेटेल.

लाभ मिळविण्यासाठी कोणाला संपर्क करावा लागेल ?

100 रुपयांमध्ये या दिवाळी बोनस संचाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी रेशनकार्ड धारकांनी संबंधित गावातील स्वस्त धान्य दुकान म्हणजेच रेशन दुकानामध्ये संपर्क करावा.

100 रुपयांच्या दिवाळी बोनस संचामध्ये कोणत्या वस्तू मिळणार ?

यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल पॅकेट भेटेल.

वरील सर्व वस्तू नागरिकांना कधी मिळणार ?

दिवाळीच्या अगोदर या सर्व वस्तू शिधापत्रिका धारकांना दिल्या जातील.

See also  नवीन मतदान नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे