50,000 प्रोत्साहन अनुदानास यामुळे उशीर | 50 hajar Protsahan Anudan Update

50 hajar Protsahan Anudan Update : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रु. अनुदान शासनामार्फत घोषित करण्यात आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना आस लागली होती की, आम्हाला 50 हजार रुपये अनुदानाची मदत केव्हा भेटली ? परंतु शेतकरी मित्रांनो, बँकेतील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे आपल्या अनुदानास उशीर होत आहे तुम्हाला माहित आहे का ?

50 हजार कर्जमाफी अनुदान अपडेट ( 50 hajar Protsahan Anudan Update )

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ( MJPSKY SCHEME ) नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती बँकेमार्फत पुढे पाठवण्यात आलेली होती; परंतु बँकेमध्ये भरण्यात आलेल्या माहितीमध्ये राज्यातील जवळपास 7 लाख 77 हजार कर्ज खात्याची माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आले आहे.

खालील जिल्ह्यातील कर्ज खात्यांची माहिती चुकीची

संबंधित बँकेमार्फत भरण्यात आलेली चुकीची माहिती लवकरात लवकर दुरुस्त करून पाठविण्याचे आदेश सहकार विभागामार्फत जिल्हा बँकांना दिले आहेत. विशेषता यामध्ये औरंगाबाद, लातूर व नांदेड या जिल्ह्यातील जिल्हा बँकेमार्फत कर्ज खात्यांची भरण्यात आलेली सगळी माहिती चुकीची आहे.

प्रोत्साहन अनुदानाची राज्यातील 7.7 लाख कर्ज खात्यांची माहिती चुकीची !

50 हजार कर्जमाफी न्यूज

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देण्यासंदर्भात घोषणा करून तीन वर्ष होत आहेत; परंतु मध्यंतरी 2 वर्ष कोरोनाच्या संकट काळामध्ये या योजनेची अंमलबजावणी शासनाकडून योग्यरीत्या करण्यात आली नव्हती, त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना अनुदान व्यतिरिक्त करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

पडताळणी दरम्यान 7.7 लाख खाती चुकीची

त्यासाठी शासनाकडून बँकेतील कर्मचाऱ्यामार्फत कर्जमाफीच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते. परंतु जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्या मार्फत माहिती अपलोड केल्यानंतर पडताळणी दरम्यान राज्यातील 7 लाख 77 हजार कर्ज खात्यांची माहिती चुकीची भरल्याचे निदर्शनास आले आहे.

See also  हळद लागवड अनुदान योजना | Turmeric Cultivation Subsidy Scheme

कर्जमाफी पोर्टल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आधीच शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची रक्कम मिळण्यास खूपच वेळ झाल्याची टीका जनतेतून व विविध प्रशासनाकडून केली जात आहे; त्यामुळे सहकारी विभागामार्फत हे प्रकरण खूपच गांभीर्य पद्धतीने हाताळले जात आहे. 50 hajar Protsahan Anudan Update

प्रोत्साहन अनुदानाच्या खात्यात काय आहेत चुका ?

कर्ज खात्याची माहिती बँक कर्मचाऱ्यामार्फत भरण्यात आल्यानंतर त्यामध्ये झालेल्या विशेषता चुका म्हणजे नाव एका लाभार्थी शेतकऱ्यांचे व कर्ज खाते क्रमांक दुसऱ्या शेतकऱ्यांचे, बंद असलेल्या खात्यांची माहिती नोंद, इन ऑपरेटिव खाते क्रमांक ( in operative Bank Account ) इत्यादी.

50 हजार कर्जमाफी अनुदान जिल्हानिहाय चुकीची कर्ज खाते खालीलप्रमाणे

जिल्हा बँकएकूण खातीयोग्यचुकीची
अकोला54,45128,20126,250
अमरावती20,30820,168140
औरंगाबाद49,860049,860
बीड8,7738,604169
भंडारा56,19751,1994,998
बुलढाणा4,9044,9040
चंद्रपूर57,27517,32839,947
धुळे17,57317,274296
गडचिरोली16,56816,312256
गोंदिया29,59027,3852,205
जळगाव74,71029,23945,471
जालना26,22326,2230
कोल्हापूर3,01,2892,93,2877,994
लातूर1,63,12101,63,121
नांदेड54,684054,684
उस्मानाबाद54,09650,0294,067
परभणी55,11153,8391,272
पुणे2,67,37891,1641,40,214
रत्नागिरी21,5684,63116,937
सांगली1,60,7331,59,6701,063
सातारा3,69,1371,60,9281,90,209
सिंधदुर्ग20,7719,447630
सोलापूर43,74342,808935
ठाणे27,05564826,407
माहिती स्त्रोत : लोकमत न्यूज पेपर

कर्ज खात्याची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्यापूर्वी विभागीय लेखापरीक्षकांमार्फत त्या माहितीची पडताळणी करण्यात आली. बँकेमार्फत कर्ज खात्याची माहिती अचूक न भरल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब होत असल्याकारणाने सहकार विभागाने लेखापरीक्षक व बँके यंत्रणेची चांगलीच झडती घेतली आहे. चुकीच्या व्यक्तींना लाभ भेटल्यास संबंधित अधिकाऱ्यावर थेट कार्यवाही करण्यात येईल अशी सुद्धा माहिती देण्यात आले.

50 हजार अनुदान केव्हा मिळणार ?

तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी थोडी वाईट बातमी आहे. विशेष करून वरील नमूद रखान्यामध्ये ज्या जिल्ह्यांच्या कर्ज खात्यांची मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असतील, त्यांना 50000 अनुदानासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

See also  ‘नरेगा’तून विहिरीसाठी शेतकऱ्यांना आता मिळणार ४ लाख अनुदान । Vihir Anudan Yojana Maharashtra 2022