Bank of Baroda Mudra Loan Yojana | आता बँक ऑफ बडोदामध्ये 50,000 रु. पासून 5 लाखापर्यंत मुद्रा लोन मिळणार

Bank of Baroda Mudra Loan Yojana : केंद्रसरकारमार्फत छोटे व्यवसायिक व लघुउद्योजक यांना भांडवल खरेदी व त्याचप्रमाणे व्यवसाय वाढवण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन ( PMMY ) योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन दिल जातं. MUDRA ( Micro Units Development And Refinance Agency ) ही भारतातील अशी एक Loan संकल्पना आहे. ज्याच्या मदतीने SME व MSME म्हणजेच Small and Medium Sized Enterprises व MSME म्हणजेच Micro Small and Medium Enterprises अंतर्गत येणाऱ्या सर्व छोट्या व मोठ्या उद्योजकांना कर्ज दिली जातात.

आजच्या लेखामध्ये आपण बँक ऑफ बडोदामार्फत ( Bank Of Baroda ) देण्यात येणाऱ्या MUDRA LOAN योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये Bank of Baroda Mudra Loan Yojana, मुद्रा लोन योजनाचे फायदे, प्रकार, वैशिष्ट्ये कागदपत्रे व अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे

  • छोट्या भांडवलावर उद्योग करणाऱ्यांना लोन सुविधा
  • कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क नाही
  • मुद्रा लोन योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील व्यवसायिक लावून घेऊ शकतात.
  • मुद्रा लोन ( MUDRA LOAN ) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेवर व्याजदर खूपच कमी असतो.
  • कमीत कमी व्याजदरावर Loan घेऊन छोटे व्यवसायिकसुद्धा व्यापार करू शकतात.

व्याजाच्या रकमेनुसार मुद्रा योजनेचे 3 प्रकार पडतात

1. शिशु योजना : शिशु योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना 50,000 रु. पर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन दिल जात. या कर्जावर एकंदरीत अर्जदाराच्या व्यवसायानुसार 9% पासून 12% पर्यंत वार्षिक व्याज आकारले जाते. शिशु योजनेच्या कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त कमीत कमी 12 महिने व जास्तीत जास्त 5 वर्ष इतका असतो.

See also  50 हजार अनुदान ३ टप्यात मिळणार ! 50 hajar anudan 2nd 3rd list

2. किशोर योजना : किशोर योजनेअंतर्गत 50,000 रु. पासून 5 लाख रुपांयपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. या श्रेणीमध्ये व्याजाचा दर बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठरविला जातो. सोबतच अर्जदाराची मागील पार्श्वभूमी व बाजारपेठेतील व्यवहार निदर्शनास घेण्यात येतो.

3. तरुण योजना : तरुण योजनेअंतर्गत 5 लाखापासून 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. कर्जाचा एकूण कालावधी त्याचप्रमाणे वार्षिक कर्जाचा दर हा अर्जदाराच्या बाजारपेठेतील व्यवहार व नावलौकिकावर बँक ठरवत असते.

Bank Of Baroda Mudra Loan Yojana Overview

योजनाबँक ऑफ बडोदा मुद्रा लोन योजना
लोन रक्कम50,000 रु. पासून 10 लाख रुपयपर्येंत
BOB अधिकृत वेबसाईटhttps://bit.ly/3B97LLR
BOB MUDRA YOJANA

मुद्रा लोन योजनेची खास वैशिष्ट्ये ( Features Of Mudra Loan Scheme )

  • मुद्रा लोन योजनेअंतर्गत Loan File करत असताना कोणतेही प्रकारच्या जामीनदाराची ( Gurantor ) आवश्यकता भासत नाही.
  • मुद्रा योजनेमध्ये Loan घेत असताना कोणतेही प्रकारचे गहाणखत ठेवावे लागत नाही.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या 10 टक्के भांडवलाची सुद्धा आवश्यकता भासत नाही.
  • मुद्रा योजनाअंतर्गत कर्ज घेण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असावे अश्याप्रकरची वयाची अट नाही.
  • पीएम मुद्रा लोन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील युवकांना जास्तीत जास्त स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.

Mudra Loan योजनेसाठीच्या अटी

  • मुद्रा Loan योजनेअंतर्गत अर्ज फक्त शासकीय बँकेमध्येच देण्यात येईल.
  • मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेणारे अर्जदार कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावेत.
  • मुद्रा लोन योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या रकमेचा उपयोग अर्जदार फक्त व्यवसाय करण्यासाठीच वापरावेत.

Mudra Loan योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • ऑनलाईन अथवा बँकेतील ऑफलाईन पद्धतीने भरलेला फॉर्म
  • अर्जदाराच्या पासपोर्ट आकाराच्या 2 फोटो
  • KYC साठी एखादे कागदपत्रं ( आधारकार्ड, मतदानकार्ड इत्यादी )
  • अर्जदार जात प्रवर्गात मोडत असतील तर जातीचा दाखला
  • व्यवसाय करत असलेल्या जागेचा पुरावा
  • किती वर्षापासून व्यवसाय करत आहात याबाबतचा दाखला
  • बँकेमार्फत विचारण्यात आलेले अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रं

बँक ऑफ बडोदा प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा फायदा कसा घ्यावा ?

बँक ऑफ बडोदा बँकेमार्फत प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना दोन पद्धतीने अर्ज करता येतो. एक म्हणजे ऑनलाईन पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑफलाईन पद्धत म्हणजेच बँकेमध्ये जाऊन प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा फॉर्म भरून बँकेत दाखल करावा लागतो. BOB Mudra Loan Online Application

See also  e-pik pahani new app version 2 | ई-पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल; नवीन ॲप ई-पीक पाहणी व्हर्जन 2 लाँच’

ऑनलाईन पद्धतीने बँक ऑफ बडोदा प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती पाहून अर्ज भरू शकतात.

बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन माहितीयेथे क्लिक करा
BOB मुद्रा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीयेथे क्लिक करा
अश्याच योजनेसाठी व्हाट्सअँप जॉईन कराजॉईन व्हाट्सअँप