Loan Waiver : 50 हजार अनुदान पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

Loan Waiver : शेतकरी मित्रांनो, 50 हजार प्रोत्साहनपर अनुदानासाठी तुम्ही पात्र असाल म्हणजेच पहिल्या यादीमध्ये तुमचे नाव आले असेल; मात्र अद्याप अनुदान रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

50 हजार कर्जमाफी अनुदान यादीत नाव आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC पूर्ण करून घेतली. त्यानंतर शासनाकडून 50 हजार अनुदानाचा शुभारंभ करून अनुदान रक्कम 20 नोव्हेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.

📢 हे सुध्दा वाचा : 50 हजार अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्यामध्ये भेटणार

परंतु यापैकी जवळपास 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी अनुदान रक्कम मिळाली नव्हती. यामागच मुख्य कारण म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक केला नाही. शासनाकडून ही रक्कम DBT प्रणालीद्वारे पाठविली जाते. ज्यामध्ये आपल्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल, त्या बँकेमध्ये रक्कम जमा करण्यात येते.

ज्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान रक्कम मिळाली नव्हती. अश्या सर्व शेतकऱ्यांना आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे.

यादीत नाव येऊन बँकेत पैसे न पडण्याचा प्रॉब्लेम हा मुख्यत्वे डीसीसी बँक ( जिल्हा मध्यवर्ती बँक ) चा होता. त्यामुळे आता DCC Bank च्या पहिल्या यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांना ( ज्यांना अनुदान मिळेला नाही त्यांना ) आजपासून 50 हजार अनुदान मिळणार.


📢 शेतमाल तारण कर्ज योजना काय आहे ? : येथे पहा

📢 50 हजार कर्जमाफीसाठी पात्र-अपात्र कोण ? : येथे पहा

See also  (मुदतवाढ) मोफत निर्धूर चूल वाटप योजना : Free Biomass Stove Scheme